छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात* *वाडीवऱ्हे येथे २ हजार ६२० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ*
भूस्खलनग्रस्त आदिवासी कुटुंबाला अवघ्या तीन दिवसांत रूपये १.३० लाखांची मदत*

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात*
*वाडीवऱ्हे येथे २ हजार ६२० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ*
*भूस्खलनग्रस्त आदिवासी कुटुंबाला अवघ्या तीन दिवसांत रूपये १.३० लाखांची मदत*
*नाशिक जनमत , दि. 28 जुलै (जिमाका वृत्तसेवा) :* शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि महसुली सेवा नागरिकांच्या दारी प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने १२७ इगतपुरी विधानसभा मतदारसंघांतर्गत मौजे वाडीवऱ्हे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महसूल विभागासह १६ विभागांच्या सहभागातून विविध शासकीय योजनांचा लाभ, महसुली सेवा आणि आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अभियानामध्ये एकूण २ हजार ६२० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलनात घर गमावलेल्या आदिवासी कुटुंबाला अवघ्या तीन दिवसांत शासनाकडून रूपये १ लाख ३० हजारांचा मदत निधी वितरित करण्यात आला.

या शिबरास आमदार हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार अभिजित बारवकर, सुनिल बच्छाव यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत विविध सेवा व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले.

*त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लाभाची आकडेवारी :*
त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत २९ नागरिकांना सनदांचे वितरण करण्यात आले. ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत २५ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील ‘नोंदणी फी’ पूर्णपणे माफ योजनेचा ४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांचा ७२८, केंद्र शासनाच्या योजनांचा ३२३, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ७०९ तसेच इतर योजनांचा ५५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. अशाप्रकारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एकूण १ हजार ८७३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला.
*इगतपुरी तालुक्यातील लाभाची आकडेवारी :*
इगतपुरी तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत १२ नागरिकांना सनदांचे वितरण करण्यात आले. तुकारामदेव कार्यसूचीच्या अंमलबजावणीसाठी ‘स्थानिक क्षेत्र’ घोषणेचा २ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत १६९ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. घरकुल योजनेचा २१, कुंभार समाजातील पारंपरिक व्यवसायासाठी ४२ तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील ‘नोंदणी फी’ पूर्णपणे माफ योजनेचा २ लाभार्थ्यांना दिला. याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांचा २६०, केंद्र शासनाच्या योजनांचा ४९, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा १५५ तसेच इतर योजनांचा ३५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. अशाप्रकारे इगतपुरी तालुक्यातील एकूण ७४७ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. असा एकूण २ हजार ६२० नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
*भूस्खलनग्रस्त आदिवासी कुटुंबाला अवघ्या तीन दिवसांत रूपये १.३० लाखांची मदत*
शिबिरात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमनी पाडा, मौजे देवडोंगरा येथील श्री. महेंद्र मंगळू थाळकर यांच्या कुटुंबाला विशेष दिलासा देण्यात आला. २४ जुलै २०२६ रोजी सततच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात त्यांचे कच्चे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया केवळ तीन दिवसांत पूर्ण केली. त्यानुसार अभियानादरम्यान आमदार श्री.खोसकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. दत्ता यांच्या हस्ते श्री. थाळकर यांना रूपये १ लाख ३० हजारांच्या मदत निधीचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविणे, विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे तसेच आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून महसूल विभागासह सर्व सहभागी विभागांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी केले


