ब्रेकिंग

सिनेमा स्टाईल पोलिसांनी त्र्यंबकमध्ये टोळीचा पाठलाग करत , ११ दरोडेखोरांना केली अटक

 

 

. :

 

प्रतिनिधी । नाशिक जनमत  नाशिक सर्व परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल देखील त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये दरोडा टाकून पाळणाऱ्या अकरा दरोडेखोरांना सिने स्टाईल  पाठलाग करत पोलिसांनी पकडले. आपत्कालीन फोन नंबर 112 अशा घटनांमध्ये किती उपयोगी होतो याचा प्रत्यय नागरिकांना आला ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी यांनी पत्रकार परिषदेत  दिलेल्या माहितीनुसार याबाबत सविस्तर वृत्त असे की

 

त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटे दरोडा टाकून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याला यश आले. ११२ आपत्कालीन क्रमांकावर तातडीने केलेल्या कॉलमुळे पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत सापळा रचून ११ दरोडेखोरांना पकडले.

 

अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी माहिती दिली. पहाटे ३ वाजेच्या सुमारास तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ १० ते १२ अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एका साईटच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे आणि इतर कामगारांना मारण्याची धमकी दिली. कामगारांचे ५ मोबाईल, ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक सबस्टेशनसाठी वापरण्यात येणारे कंडक्टर वायरचे दोन ड्रम, असा ११ लाख ११ हजारांचा मुद्देमाल त्यांनी लुटला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की

११२ वर कॉल व सतर्कता कामगारांनी घाबरून न जाता तत्काळ डायल ११२ वर कॉल केला. त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी शोध सुरू केला. एक ट्रॅक्टर जाताना दिसला. पोलिसांचे वाहन येत असल्याचे बघता ट्रॅक्टर

 

सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करत मनीष्ष मदन सिंग, रोशन खंडू पाटील, योगेश कुमार सीताराम कुमार, गणेश कैलास कातोरे, अथर्व संजय सारुक्ते, समाधान शिवाजी मालुंजकर, कुणाल शरद चोथे, शेखर जीवन अस्वले, अजय जीवन चोथे, मनोज शांताराम मुर्तडक यांन पकडले.

 

 

संशयितांकडून प्राणघातक हत्यारे व पिस्तूलसदृश लायटर जप्त करण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलिसांचे सर्व नागरिकांतर्फे कामगिरीबद्दल अभिनंदन चा  चा वर्षा व होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे