बिर्याणी खाल्ल्यानंतर खाले टरबूज. चार जणांचा मुंबईत मृत्यू.

नाशिक जन्मत मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे मृत्यूचे कारण अजून समजले नाही. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे की
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने प्रकृती खालावलेल्या चौघांचा जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही अन्नबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अहवालातून नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
मुघल भेंडी बाजारातील बिल्डिंगमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (४०) हे पत्नी नसरीन (३५), मुली आयशा (१६) आणि झैनब (१३) यांच्यासह वास्तव्यास होते. त्यांचे इतर चार भाऊ मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. शनिवारी त्यांनी सर्व भावांना घरी जेवायला बोलावले होते.
चौघांपैकी दोन भाऊ आणि त्यांची तीन मुले असे पाच जण जेवायला
बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने बाधल्याचा अंदाज
आले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सर्वांनी बिर्याणी, तसेच इतर अन्नपदार्थ एकत्र खाल्ले. भाऊ आणि त्यांची मुले रात्री घरी परतल्यानंतर अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरामध्ये शिल्लक असलेले अर्धे कलिंगड खाल्ले. पहाटेच्या सर्वांना पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्या. डॉक्टरने औषध दिल्यानंतर काही वेळ प्रकृतीत सुधारणा झाली, मात्र पुन्हा बिघडली. दरम्यान शेजारी असलेल्या नागरिकांनी रात्री त्यांना वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु ते वाचू शकले नाही. सध्या उन्हाळा असल्याने थंड पदार्थ म्हणून कलिंगड कडे बघितले जाते. अनेक ठिकाणी हे कलिंगड लाल दिसावी म्हणून इंजेक्शन फ़ालास मारले जाते. दरम्यान कशामुळे मृत्यू झाला याबद्दल अधिक माहिती घेतली जात आहे.

