ब्रेकिंग
कुटुंबिक वादातून तीन नातेवाईकांन सह अमेरिकेत चार जणांची हत्या.

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तीन नातेवाइकांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. विजय कुमार असे आरोपीचे नाव आहे.
विजय कुमारने भारतीय नागरिक असलेली त्याची पत्नी मीमू डोग्रा (४३) यांच्यासह गौरव कुमार (३३), निधी चंदेर (३७) आणि हरीश चंदेर (३८) या नातेवाइकांची हत्या केली. अटलांटा येथे राहणाऱ्या
विजयकुमार आणि मीमू डोग्रा.

विजय कुमार आणि डोग्रा यांच्यात वाद झाल्यानंतर ते १२ वर्षांच्या मुलासह ब्रूक आयव्ही कोर्ट येथील नातेवाइकांकडे गेले. तिथे वाद विकोलाला गेल्यानंतर विजय कुमारने शुक्रवारी मध्यरात्री २.३०च्या सुमारास पत्नीसह इतर तिघांवर गोळीबार केला.



