ब्रेकिंग

पनवेल मध्ये लोकलमधून मुलीला ढकलणाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी.

लोकलमधून मुलीला ढकलणाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

, दि. २२ प्रतिनिधी पनवेल मध्ये लोकल मध्ये महिलांच्या डब्यात बसलेल्या पुरुषांनी खाली उत्तर म्हणून म्हणल्याने चक्क एका महिलेला लोकांच्या खाली फेकून दिले यामुळे सध्या महिला वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की

 

महिलांच्या डब्यात एक पुरुष चढला, ते पाहून इतर महिलांनी त्याला खाल उतरण्यास सांगितले. मात्र यामुळे संतापलेल्या त्या इसमाने एका १८ वर्षांच्या तरूणीला धावत्या लोकलमधूने थेट खाली ढकलून फेकून दिलं. यामुळे प्रवाशांना प्रचंड धक्का बसला, अनेक जण सुन्न झाले. मात्र काही महिला प्रवाशांनी हिंमत दाखवत त्या आरोपीला पकडले आणि जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

५० वर्षीय शेख अख्तर नवाज असे आरोपीचे नाव असून तो मुंबईल लोकलमधील महिलांच्या डब्यात चढला होता. ते पाहून डब्यातील काही महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले, यावरून त्यांच्यात बोलाचाली

झाली. एका १८ वर्षांच्या तरूणीनेही नवाज याला विरोध दर्शवत खाली उतरायला सांगितले. मात्र ते ऐकून आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देऊन बाहेर फेकले. खाली पडलेली ती तरूणी गंभीर जखमी झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली. ट्रेनमधून त्याच दरम्यान त्या लोकलमधील इतर महिलांनी आरोपी नवाजला पकडले आणि त्याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे