ब्रेकिंग

अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचे विमान अपघातात निधन.

नाशिक जनमत  काल बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्रीअजित पवारांसह पाच जण ठार झाले त्यात मोठ्या मंत्र्यांचे व अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव  यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबावर व गावावर पसरली आहे

 

देशसेवेच्या ध्येयाने १७ वर्षांपूर्वी पोलिस दलात भरती झालेले विदीप जाधव हे मंत्र्यांचे विश्वासू अंगरक्षक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी नेटाने कर्तव्य बजावले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आपणही पोलिस दलात भरती झाल्याचे त्यांचे चुलतभाऊ गणेश जाधव यांनी ‘ सांगितले.

मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे रहिवासी – असलेले विदीप जाधव पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह

 

ठाण्यातील कळवा, विटावा येथील चाळीत राहत होते. विदीप यांच्या अकाली निधनामुळे कळव्यासह त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली. विदीप यांनी याआधी पाच वर्षे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अंगरक्षक म्हणून काम केले होते. काही वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते, असे गणेश जाधव यांनी सांगितले.

विदित जाधव यांच्या गावाचे नाव तरडगाव एग्रीकल्चर शिक्षण घेत असताना त्यांनी पोलीस भरती केली आणि ते पोलीस भरती झाले पाच वर्षे त्यांनी देवेंद्र फडवणीस यांचे अंगरक्षक म्हणून काम केले 2016 पासून ते अजित पवारांचे अंगरक्षक होते

त्यांचे वडील नायगाव मुंबई येथे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात कारकून म्हणून नोकरीस होते दोन वर्षांपूर्वी सेवा निवृत्ती झाले होते.. विजित जाधव यांची मुलगी आठ वर्षाची असून तिचे नाव नेत्र आहे. तर मुलगा अद्रक हा चार वर्षाचा आहे पत्नी सध्या ही फार्मास्ट काम करते. अपघाताच्या आधी गेले पाच दिवस ते आजारी होते त्यांची आई त्यांना कामावर जाऊ नको असे म्हणत असतानाही बुधवारी सकाळी बारामती येथे अजित दादांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सभा असल्यामुळे घरातून पाहाटे 5 वाजता अजित दादा सोबत जाण्यासाठी ते कायमचे. यांचा निधनामुळे संपूर्ण कुटुंब व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांना नासिक जन्मत संपादक चंद्रकांत यांच्याकडून विनम्र श्रद्धांजली.

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे