होमेथान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद. 175 कोटी्ची उलाढाल तीनशे दहा कुटुंबांनी घेतली घरे.
भेट, 3१० कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण
होमेथान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद. 175 कोटी्ची उलाढाल
प्रतिनिधी ।
नाशिक जन्मत नाशिककरांना व सर्वसामान् नागरिकांचे गृह स्वप्न पूर्ण होण्यासाठी डोंगरे वस्तीगरावर लागलेल्या चार दिवसीय होमेथॉन प्रदर्शनास नागरिकांच्या मोठा प्रतिसाद लाभला.
नरेडको नाशिकने डोंगरे वसतिगृ मैदान येथे भरविलेल्या ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ मध्ये ४ दिवसात ४५ हजार लोकांनी भेट दिली. येथे ३१० फ्लॅटसचे ऑन द स्पॉट फ्लॅटस्चे बुकिंग झाले असून यातून १७५ कोटींची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, येथे मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमधील शहरांमधुनही नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनाने पुढील किमान तीन महिने रियल इस्टेटमध्ये तेजी पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाची सांगता रविवारी सायंकाळी झाली. प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, सह समन्वयक उदय शहा, अभय नेरकर, मर्जीयान पटेल, सेक्रेटरी शंतनू देशपांडे, माजी अध्यक्ष, अभय तातेड आदींनी अदर्शन यशस्वीतेकरीता प्रयत्न केले.
१५ हजार वृक्ष लावणार
प्रदर्शनात १५ हजार नोंदणी झाली असून तितकेच वृक्ष बांधकाम प्रकल्प परिसरात लावले जातील. – सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक
बाजारात चैतन्य
या प्रदर्शनाने बाजारात चैतन्य निर्माण केले असून आमचे १३ फ्लॅट येथे बुक झाले आहे. .-दिपक चंदे, संचालक, दिपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स
अतिशय उत्तम प्रतिसाद
प्रदर्शनाला अतिशय उत्तम प्रतिसाद नाशिककरांनी दिला. साइट व्हिजीटस्ही होत होत्या.
भूषण महाजन, बांधकाम व्यावसायिक