आयमा .त उद्योजक एकता पॅनल चा विजय. पंधरा वर्षांनी सत्ता परिवर्तन राजू पानसरे यांचा दणदणीत विजय

उद्योजक एकता पॅनलचा विजय, ललित बुब पराभूत, बेळेंना धक्का,
प्रतिनिधी । नाशिक जन्मत नाशिकच्या उद्योजक एकता पॅनलचा आयमा निवडणुकीमध्ये दणदणीत विजयझाला असून आयमाच्या अध्यक्षपदी राजू बुधाजी पानसरे हे बसणार आहें.

–
उद्योजकांची संघटना अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलचा धुव्वा उडवत विरोधी उद्योजक एकता पॅनलने विजयाचा गुलाल उधळला. अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांनी १२३ मतांनी एकता पॅनलच्या ललित बुब यांचा तर खजिनदारपदासाठी अविनाश बोडके यांनी हर्षद बेळे यांचा ४० मतांनी निसटता पराभव केला. यामुळे सुमारे दीड दशक एकहाती असलेली एकता पॅनलची सत्ता उलथवून लावण्यात विरोधकांना यश आले.
सत्ताधारी एकता पॅनलने विद्यमान अध्यक्ष ललित बुब यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा पसंती दिली होती. मात्र या पदासाठी व्यापूर्वीच आपल्याला दिलेला शब्द
उद्योजक एकता पॅनलच्या समर्थकांची गुलाल उधळत असा जल्लोष केला.
विरोधकांनी दिलेला शब्द पाळावा या मुद्द्यावर पानसरे ठाम होते. मात्र तडजोड न झाल्याने ही निवडणूक झाली. २३४६ पैकी १४९६ मतदारांनी

शुक्रवारी मतदान केले. शनिवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी दु. १२.३० वाजता पूर्ण झाली. यावेळी गुलाल उधळून मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली होती. दरम्यान राजू पानसरे यांनी लघु उद्योजकांसाठी विकासाचे काम सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे नाशिक जन्मत ची बोलताना सांगितले.


