महानगर पत्रकार परिषदची २०२६ साठी कार्यकारणी जाहीर* *ज्येष्ठ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली नवीन टीम कार्यरत*

*महानगर पत्रकार परिषदची २०२६ साठी कार्यकारणी जाहीर*
*ज्येष्ठ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली नवीन टीम कार्यरत*
महानगर पत्रकार परिषद संस्थेच्या सन २०२६ साठी सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या प्राथमिक कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष दिनेश पंत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष करणसिंग रामसिंग बावरी यांनी कार्यकारणी जाहीर केली आहे.
नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी करणसिंग रामसिंग बावरी यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून लियाकत पठाण व संजय परदेशी यांची जबाबदारी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विकास बाविस्कर व रोशन गव्हाणे, सचिवपदी सुरेश पिंगळे व खान नजमुल इस्लाम, तर खजिनदारपदी पंकज पाटील व अमित कबाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटक म्हणून भाऊसाहेब बोराडे व विश्वास लचके, समन्वयक म्हणून गिरीश जोशी व चंद्रकांत धात्रक, प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिनेश भागवत व दिनेश पगारे, तर कार्यालय प्रमुख म्हणून योगेश रोकडे व भैय्यासाहेब कटारे यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या कार्याला दिशा देण्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींची तज्ञ सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये चंदुलाल शहा, प्रा. श्रीकांत सोनवणे, प्रियदर्शन टांकसाळे, जयंत महाजन, अनिल वैद्य, सुधीर कुलकर्णी, नरेंद्र जोशी, अभय ओझरकर, सुधीर उमराळकर, हरिभाऊ सोनवणे, हर्षवर्धन बोराडे, ॲड. ज्ञानेश्वर आंधळे, दत्ता शिंदे, मुक्तेश्वर मुनशेटीवार, राजेश अग्निहोत्री, नानासाहेब पाटील, डॉ. प्रज्ञा पाटील, देवांग जानी, शेखर गायकवाड व प्रा. उमेश पठारे यांचा समावेश आहे.
तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून धनंजय बोडके, चंद्रशेखर गोसावी, राकेश पाटील, संकेत भंगाळे, विवेक बोकील, विकी कदम, संदीप नगरकर, वखार खान, तोसिफ शेख, नरेंद्र दंडगव्हाळ, प्रदीप जगताप, रामभाऊ आवारे, ज्ञानेश्वर तुपसुंदर, भगवान थोरात, सुनील मणियार, विजय बागुल, गौतम संचेती, हेमंत काळमेख, संतोष भावसार, परमेश्वर आंधळे, विक्रम भास्कर, उल्हास शिरसाट, प्रकाश जोशी, अमोल लिंगायत, डॉ. राकेश श्रीवंश, शमशाद पठाण, पियुष जोशी, संतोष लचके, सलीम खान, स्वप्निल बागुल, रणजीत झापर्डे व कादिर पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, संघटन बळकटीकरण, पत्रकार संरक्षण व व्यावसायिक पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असा विश्वास अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी व्यक्त केला.


