ब्रेकिंग

पंधरा दिवसाच्या बाळंतीन महिलेची दोन लहान मुलांन सह आत्महत्या.

पंधरा दिवसाचे बाळ देखील विहिरीत टाकून आत्महत्या.

 

 जळगाव नासिक जनमत  प्रतिनिधी

 पंधरा दिवसापूर्वी एका लहान बाळाला जन्म दिलेल्या महिलेने सासरी गेल्यानंतर दोन चिमुकल्यास विहिरीत उडी मारण्याची घटना चोपडा तालुक्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण चोपडा तालुका हदरला आहे.

उमर्टी (ता. चोपडा, ता. जळगाव) येथे एका २८ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलासह आणि १५ दिवसांच्या नवजात बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी ही घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा विरेन आणि १५ दिवसांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

पमिता ही काही दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली होती. विश्रांतीसाठी ती आपल्या माहेरी आली होती. चार दिवसांपूर्वी पती तिला सासरी घेऊन आला होता. त्यानंतर ती मोठा मुलगा व १५ दिवसांच्या नवजात बाळासह मंगळवारी (दि.२७) बेपत्ता झाली

 

होती. शोध सुरू असताना बुधवारी पमितासह दोघे मुले असे तिघांचे मृतदेह उमर्टी शिवारातील त्यांच्या स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले.

 

या घटनेबाबत मृत महिलेचा भाऊ आकाश पावरी याने पोलिसांत तक्रार दिली. पमिताची प्रसूती होऊन केवळ १५ दिवस झाले असल्याने तिला आणखी काही दिवस माहेरी विश्रांती घेऊ द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, सासरच्या मंडळींनी काहीही न ऐकता तिला जबरदस्तीने सासरी नेले. मंगळवारी ती बेपत्ता असल्याची आणि बुधवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती सासरकडूनच देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सासरचे मंडळीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी माहेर कडील नागरिकांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे