ब्रेकिंग

नाशिकच्या महापौरपदी हिमगिरी आडके . तर उपमापोरपदी मच्छिंद्र सानप.

दोघांनी अर्ज केले दाखल.

नाशिक जनमत  नासिक महानगरपालिकेमध्ये महापौर व उपमहापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी सभापती हिमगोरी आडके. यांच महापौर पदी तर मच्छिंद्र सानप यांचे नाव उपमहापौरपदी सुचविण्यात आले आहे तसे अर्ज आज भरण्यात आले.

भारतीय जनता पार्टी तर्फे निवडून आलेल्या बहात्तर नगरसेवकांची आज मीटिंग बोलवण्यात आली होती त्यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा येत असून महानगरपालिकेच्या कामाचीमाहिती असलेल्या नगरसेवकांना महापौर हे अत्यंत महत्त्वाचे पद दिले जावे अशी भावना प्रगट केली. नवीन चेहऱ्यांना संधी दिली असती तर पक्षातर्फे चुकीचा मेसेज गेला असता असे त्यांनी यावेळेस बोलून दाखवले.

येणाऱ्या सहा तारखेस उपमहापौर महापौर यांची निवडणूक खुर्चीवर विराजमान होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज झालेल्या मीटिंग मध्ये भाजपा अध्यक्ष सुनील केदार आमदार बाळासाहेब सानप कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर मिटींगला उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे