प्रतिनिधी सातपूर
नाशिक एका तरुणाने मुलीला मोटरसायकलवर तुला मागे बसवतो येते का गाडीवर असे बोलून विनयभंग केल्याने. व तो तरुण मुलीला नेहमी त्रास देत असल्याने त्याला नातेवाईक मित्राने चांगला चोप दिला असा प्रकार सातपूरमध्ये घडला. दरम्यान यावेळी नागरिक व पोलिसांमध्ये तनाव निर्माण झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की
एक तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून जमावाने तरुणाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याच संतप्त जमावाने पोलिस चौकीमध्ये घुसून संशयितावर हल्ला करण्याचा तसेच पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकवण्याचा प्रयत्न करत वरिष्ठ निरीक्षकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार बोलकर पोलिस चौकी सातपूर येथे घडला. संशयित तरुणाच्या विरोधात पोक्सो आणि मुलीच्या वडीलासह सहा संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंमलदार दिपक चव्हाण यांच्या तक्रारीनुसार सातपूर येथील
हिंदी शाळेजवळ मुलीची छेडछाड केल्याचा त्यांना ११२ हेल्पलाईन वर कॉल आला. घटनास्थळी जमावाकडून एक तरुणाला बेदम मारहाण सुरू होती. तरुणाला बोलकर चौकीत आणले. मुलीचे वडिल आणि त्यांच्या सहा साथीदारांनी पोलिस चौकीत आरडाओरड ‘आमच्या ताब्यात द्या त्याला मारुन टाकतो. पोलिस काय करणार असे बोलून तरुणाला पोलिसांच्या समोरच मारहाण केली. त्याचवेळी अंमलदार अमोल मोरे यांच्या कमरेला लावलेले पिस्तूल हिसकवण्याचा प्रयत्न केला. सातपूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहेर यांच्या अंगावर जमाव धावून गेला. दरम्यान नाशिक शहरामध्ये पोलिसांचा वचन थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.