ब्रेकिंग

मांजामुळे डॉक्टरचे दोन्ही डोळे दुखापतग्रस्त, चेहऱ्यास २५ टाके

मनमाड येथील घटना; उपधारांसाठी पाठवले नाशिकला

मांजामुळे डॉक्टरचे दोन्ही डोळे दुखापतग्रस्त, चेहऱ्यास २५ टाके

 

प्रतिनिधी |नाशिक मनमाड   मकर संक्रात एक महिन्यावर आली असून सध्या पतग प्रेमी  पतंग कट करण्यासाठी मांजाचा सरस वापर करत असल्याचे दिसत आहे. मांजामुळे अनेकांचे जीव व जखमी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढले आहे. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांवर व वापरणाऱ्या वर क** कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

 

 

काल नायलॉन मांजामुळे मनमाडमध्ये सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. विद्या योगेश मगर यांचे दोन्ही डोळे, नाक आणि चेहरा कापला गेला. त्यांच्या जखमांवर २५ टाके घालण्यात आले आहेत. दुखापती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला नेण्यात आले आहे. त्या विवेकानंद नगर भागातून दुचाकीवरून ‘सुराणा. संकुल’ येथील क्लिनिककडे जात होत्या. ईदगाह परिसरातील पुलावरून जात असताना ही घटना घडली. त्यांना त्वरीत खासगी रुग्णालयात नेण्यात

 

 

महिला डॉक्टर विद्या मगर यांच्यावर उपचार करणारे डॉ. फईम कुरेशी म्हणाले की, जखमा खोल असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सुमारे २५ टाके टाकावे लागले. त्यांचे दोन्हीही डोळे अवघ्या दोन मिलिमीटरने वाचले आहेत. उजवा व डावा डोळा, पापणी तसेच चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. उपचारासाठी नाशिकला त्यांना पाठवण्यात आल्याने उपचार लवकर मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे