संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर* *उपविभागीय अधिकाऱ्यांची त्र्यंबकेश्वरला भेट*
*
संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर*
*उपविभागीय अधिकाऱ्यांची त्र्यंबकेश्वरला भेट*
*नाशिक, दि. १६ नाशिक जनमत वृत्तसेवा)* : संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पूर्वतयारीस प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्री. दत्ता यांनी पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह यात्रेशी संबंधित स्थळांची पाहणी केली. यात्रेच्या अनुषंगाने बुधवार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सर्व विभाग व संबंधित हितधारकांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय समन्वय बैठक होणार आहे.
या बैठकीत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासोबत यात्रा अनुदानासाठी आवश्यक अंदाजपत्रकही निश्चित केले जाणार आहे. तयार करण्यात आलेला आराखडा पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती निवारण आराखड्याची अंमलबजावणी प्रथमच या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही यात्रा सदर आराखड्याची प्राथमिक चाचणी ठरणार असून, यात्रेदरम्यान मिळालेल्या अनुभवांच्या आधारे आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.