म्हसरूळ परिसरात पिण्याचा बाणा करत महिलांनी केली चोरी.
नाशिक नाशिक शहरात चार-पाच महिला फिरत असून त्या| पाणी पिण्याचा बहाणा करत घरात प्रवेश करत चोरी करत असल्याचे दिसून आले आहे. सोसायटीतील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पंचवटी पोलिसांनी केले आहे 
कपाटातील ८ हजारांची रक्कम चोरी केली, लामखेडे मळा येथे हा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धांत धनले (रा.लामखेडे मळा) यांनी तक्रार दिली. सकाळी ९ वाजता श्री गणेश अपार्टमेंट येथे मुलगा घरी असताना दोन अनोळखी महिलांनी पिण्यास पाणी मागितले. नजर चुकवून घरात प्रवेश केला. बेडरुम मधील कपाटात ठेवलेली ८ हजारांची रक्कम चोरी केली. पोलिस तपास करत आहे. परिसरात दोन अनोळखी महिला फिरुन घराची रेकी करतात लहान मुले घरी एकटे असल्याची संधी साधून पाणी पिण्याचा बहाणा करत दरवाजा उघडण्यास सांगून लहान मुलांची नजर चुकवून घरात प्रवेश करत चोरी करतात.
अशा प्रकारे कोणी पाणी मागत असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन पंचवटी पोलिसांनी केले आहे.



