ब्रेकिंग
फाल्गुनी उन्मेष महाजन अनंतात विलीन*
*फाल्गुनी उन्मेष महाजन अनंतात विलीन*
नाशिक । दि. १८ डिसेंबर २०२५ धुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री. उन्मेष महाजन यांची मुलगी फाल्गुनी महाजन यांचे आज १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्या २७ वर्षांच्या होत्या.
आज सायंकाळी ५.०० वाजता पंचवटी अमरधाम येथे फाल्गुनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फाल्गुनी ह्या औषधनिर्माण शास्त्र विषयातील पदवीधर होत्या. त्या एम.बी.ए. (फायनान्स) चे उच्चशिक्षण अमेरिकेत घेत होत्या. फाल्गुनी यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, आजोबा असा परिवार आहे.