पावसामुळे पुन्हा खड्डे. खड्ड्यात दुचाकी आदळून दुचाकी चालकाचा मृत्यू
नाशिक जन्मत नाशिक शहरात सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेवर टीका झाल्या असल्याने मागे उघडलेल्या पाच-सहा दिवसाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आली. परंतु खड्डे बुजवण्याचा दर्जा चांगला नसल्याने पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. वाहनचालकांसाठी मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे. अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
काल मग मला बाद येथील उदयनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक हे खड्ड्यात दुचाकी आद ळल्याने जखमी झाले होते. दरम्यान त्यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे.
अधिक माहिती अशी की दिनकर पांडुरंग झेटे वय 61 हे तारवाला नगर कडून अमृतधाम रोडवर दुचाकी चालवत होते यावेळेस त्यांची दुचाकी खड्ड्यात आढळल्याने ते खाली पडले व त्यांना मार लागला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेला असून संबंधितांवर सदोष मनुष्य वधा चा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.