ब्रेकिंग

गणेश विसर्जनाच्या वेळी नदीत व पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू. दोन जण बेपत्ता.

एकीकडे आनंद साजरा होत असताना. मृत्यूच्या कुटुंबांमध्ये शोक.

नाशिक जन्मत प्रतिनिधी   नाशिक शहरामध्ये गणेश विसर्जनादरम्यान पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आत्तापर्यंत आलेली आहे.

नाशिक शहरातील आनंदवली येथील गोदावरी पुलावर प्रवीण शांताराम चव्हाण सातपूर कॉलनी हा वाहून गेला आहे. गोदावरी पुलाजवळ तो विसर्जनासाठी गेला यावेळी तिथे सुरक्षा रक्षक नव्हते. महानगरपालिकेने कृत्रिम तलाव तयार केले होते या ठिकाणी मूर्ती दान केले असतील तर ही घटना घडली नसती. तर गोवर्धन शिवारामध्ये विष्णू डगळे वय 34 हा गणेश विसर्जनासाठी केला होता यावेळी गंगापूर याचा पाय घसरल्याने तो पाण्याजवळ गेला व पाय घसरला तर तो वाहून गेला  तर तिसरी घटना दिंडोरी रोड परिसरात असलेल्या आरोग्य विज्ञान पीठामागील खदानी मध्ये चंदन माळेकर बोरगड येथील युवक याचा खदानीमध्ये बुडून मृत्यू झाल्या आहे. त्याचा मृत्यू या ठिकाणी मिळून आला आहे या ठिकाणी हा युवक गेल्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते तसेच बंदी असताना देखील तो गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर चौथी घटना सिन्नर येथे ओमप्रकाश सुंदरलाल लिहा रे सिल्वर स्कूल जवळ नदीपात्रात पाय घसरल्याने तो बुडाला नदीपात्रात चिखल असल्याने मदत कार्यात अडथळे आले. त्याच्या मृत्यूमुळे नातेवाईक व सर्व परिसरामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर पाचवी घटना कळवण येथील दिनेश बाबुराव राजभोज व 39 वर्ष हा गणपती विसर्जनासाठी गेला होता . देसरा नेत पुनद नदीमध्ये  फरशीवर पाय घसरून पडला व नदीत बुडाला . अशा दुर्दैवी घटना या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये घडला आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासन वेळोवेळी नागरिकांना कृत्रिम तलावामध्ये मूर्ती दान करा पाण्याजवळ जाऊ नका असे आवाहन करता पण तरीही युवक दुर्लक्ष करत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सर्व तरुण युवक असल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे