ब्रेकिंग
सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
*सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
नाशिक, दि. 7: येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्र. विभागीय महसूल उपायुक्त डॉ. राणी ताटे यांनी दिली आहे.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात. या लोकशाही दिनात अशाच प्रकारचे अर्ज स्वीकारले जातील. अर्जदारांनी सोबत येताना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल केलेले प्रकरण आणि त्यासंदर्भातील मिळालेली माहिती यावेळी सादर करणे आवश्यक आहे.