घरफोडीत १ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरी
नाशिक जनमत| वाढत्या लोकसंख्येबरोबर पोलिसांची गस्त कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये घर फोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ये चोर दिवसा रेकी करत असून रात्री घर फोडत आहे. असाच प्रकार काल जेलरोड घडला आहे फ्लॅटच्या खिडकीचे
गज तोडून आत प्रवेश करत बेडरूममधील १ लाख ७८ हजारांचे दागिने चोरी करण्यात आले. मंगलमूर्तीनगर जेलरोड येथे हा प्रकार उघडकीस आला. नवनीत चौबे यांनी पोलिसांत तक्रार दिली. बाहेरगावी गेलेले असताना फ्लॅटच्या खिडकीचे गज तोडून खिडकीतून घरात प्रवेश केला. दोन बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे महत्त्वाचे झाले आहे. सीसीटीव्ही प्रत्येक सोसायटीत बसावे. तसेच होत असेल तर खाजगी वाचमेन ठेवला तर असे प्रकार थांबतील असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.