ब्रेकिंग
रात्रीच्या वेळी महामार्गावर उभा असलेल्या ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरास अटक.
प्रतिनिधी
| नाशिक जन्मत दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन नाशिक परिसरामध्ये महामार्ग रस्त्यावरील उभ्या असलेल्या ट्रक मधून चोरी करणाऱ्या अटल चोरास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे.
महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांनी छडा लावला आहे. यातील अजय सोमनाथ मोगले (२१, रा. रांजणगाव रोड, राहाता) यास ताब्यात
घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीसाठी वापरलेली कार, चोरीचे साहित्य असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांन गुन्हे शोध पथकाला घटनेचा तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. ग्रामीण आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे महत्त्वाचे आहे. अशी वाहनधारक मागणी करत आहे.