रासबिहारी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
रासबिहारी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
प्रतिनिधी
| नाशिक जन्मत नासिक शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून अपघाताची संख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्डेच खड्डे झालेले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे काल नाशिक येथील पेठ रोड वरील
आरटीओ कॉर्नरकडून रासबिहारी लिंकरोड, गायत्री नगरमध्ये पोकार भवनसमोर हितेश प्रवीण पाटील (२७, रा. साईनगर, आरटीओ कॉर्नर) याच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती आणि नितीन पाटील यांच्या तक्रारीनुसार हितेश रात्री ११ वाजता हा एमएच १५ एफवा
२९३९ वरून आरटीओ कॉर्नरकडून गायत्रीनगरकडे जात असताना पोकार भवनसमोर अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. रस्त्यावर जाणाऱ्या काही वाहनचालकांनी ११२ ला कॉल करत माहिती दिली. हितेशला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. आजीबाई वडिलांबरोबर राहत होता. इलेक्ट्रिशन चे काम तो करून आपली उपजीविका पार पाडत होता
. रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.