दिराच्या घरी भाऊजई नी केली चोरी. पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात.
घरफोडी करणाऱ्या भावजयीसह मैत्रिणीस अटक
नाशिक : नातेसंबंधांमध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे. दिराच्या घरीच चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई नाका येथे
घरफोडी करून फरार असलेल्या भावजीसह तिच्या मैत्रिणीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरीत एकूण ५९ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज विनोद कांकरिया (रा. मुंबई नाका) दि. ५ एप्रिल रोजी कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले होते. ७ एप्रिल रोजी घरी परतले असता, घरातील सोन्या-चांदीचे दागिने व पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच
येथे तक्रार दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या भावजयीने ही चोरी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्यानुसार शोध घेत, गुन्हे शोध पथकाने मुंबई येथून संशयितेस ताब्यात घेतले. तसेच, या चोरीत तिला मदत करणारी तिची मैत्रीण अमरिता दिव्येश टक्कर यांनी मदत केली.
(गुजरात) येथे सापळा रचून अटक केली.
दोघींकडून एकूण ५२ तोळे वजनाचे ४६ लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक समद बेग तपास करीत आहेत.
पोलिस उपायुक्त मोनिका राउत व सहायक आयुक्त नितीन जाधव
निरीक्षक संतोष नरूटे व सहायक निरीक्षक (गुन्हे) सुधीर पाटील यांच्या सूचनांनुसार गुन्हे शोध पथकाचे समद बंग, रोहीदास सोनार, हवालदार देवीदास गाढवे, अंमलदार योगेश अपसुंदे, समीर शेख, आकाश सोनवणे, राजेंद वाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे दीपक जगडाले यांनीहा गुन्हा उघडीस आणला. अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहे.