ब्रेकिंग

अ. भा. महानुभाव परिषदेचे शनिवारपासून पंचवटीमध्ये दोन दिवसीय अधिवेशन

 

 

अ. भा. महानुभाव परिषदेचे शनिवारपासून पंचवटीमध्ये दोन दिवसीय अधिवेशन

 

 

 

प्रतिनिधी । नाशिक जन्मत

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे दोन दिवसीय अधिवेशन शनिवारपासून (दि. २५) सुरूवात होणार आहे. पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रोडवरील जय शंकर, फेस्टिव्हल लॉन्स येथे हा सोहळा होणार आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, संत, महंत, सद्भक्त, पुजारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

या दोन दिवसीय सोहळ्याची रूपरेषा प्रसिद्ध करण्यात आली असून शनिवारी (दि. २५) सकाळी ८:३० वाजता

 

पालखी सोहळा व ग्रंथ दिंडी, ध्वजारोहण, अधिवेशनीय सभागृह व ग्रंथ नगरीचे उद्घाटन होणार आहे. सकाळी १० वाजता उ‌द्घाटकीय सत्र होणार आहे. रात्री ९ वाजता द्वितीय सत्रात महानुभाव मराठी साहित्य व साहित्यिकांच्या विचारांची अमृततुल्य मेजवाणी अनुभवयास मिळणार आहे.

 

रविवारी (दि. २६) सकाळी ७वाजता भगवद्‌गीता पाठ पारायण, सकाळी ९ वाजता महानुभाव परिषदेचे समारोपीय सत्रात स्वागत समारंभ, संतपूजन प्रास्ताविक, मावळत्या अध्यक्षांचे विचार मांडतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य नेते व संतगणांच्या प्रमुख उपस्थितीत मंहत मोहनराज कारंजेकर बाबा यांचा महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदाचा

 

पदभार स्वीकार समारंभ होईल. दुपारी ११.४५ धर्मसभा आभार व निरोप समारंभ होईल. याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाट आदी उपस्थित असतील. महत सुकेणकर बाबा महानुभाव, महंत चिरडे बाबा महानुभाव आणि कृष्णराज बाबा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अधिवेशनाचा सोहळा पार पडणार

 

आहे. या दोन दिवसीय अधिवेशनाचे संयोजन

 

माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, महानुभाव परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाश ननावरे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील संयोजन करित आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे