दुचाकीच्या धडकेत 56 वर्षीय नागरिक ठार. शहारात वाढते अपघाताची संख्या.
दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणारा पादचारी ठार
प्रतिनिधी
|
नाशिक जनमत दिवसेंदिवस नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या देखील वाढत आहे. दरम्यान अरुंद रस्ते वाढती ट्रॉफी क यामुळे दररोजचे अपघात सुरू झालेले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी देखील जात आहे. नासिक ट्राफिक पोलिसातर्फे वाहतुकीचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे झाले आहे.
दरम्यान काल सातपूर ते गंगापूर रिंग रोडवर
भरधाव जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी ठार झाला. सायंकाळी ७.३० वाजता ध्रुवनगर बस स्टॉप येथे हा अपघात घडला. सुरेश विठ्ठल क्षीरसागर (५६, रा. ध्रुवनगर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आदित्य क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, वडील सुरेश क्षीरसागर घराजवळून पायी जात रस्ता ओलांडत असताना अशोकनगरकडून बारदान फाट्याकडे जाणारी एमएच १५ जेआर ३८३३ या क्रमांकाच्या दुचाकीने पाठीमागून धडक दिली. डोक्यास, पोटाला व छातीला गंभीर मार लागला. रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गंगापूर पोलिस ठाण्यात चालक नितेशसिंग ठाकूर (रा. गंगापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरामध्ये अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दोनच दिवसापूर्वी सीबीएस येथे वाढदिवस करून परतणाऱ्या मित्रांच्या गाडीला अपघात झाला होता यात एक मित्र ठार झाला होता तर चार जण जखमी झाले होते. संध्याकाळी व सकाळी अंबड तसेच सातपूर एमआयडीसीमध्ये कर्मचारी यांची सुटण्याची व कंपनी चालू होण्याची वेळ असल्याने गर्दी प्रमाण वाढू लागले आहे.