नाशिक शहरात गावठी कट्टे विकणारी टोळी असण्याची शक्यता.
जेल रोडला गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित युवकास अटक.
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत
नाशिक शहर व परिसरामध्ये गावठी कट्टे विक्री करणाऱ्या व्यक्तींची टोळी असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांकडे सरसपणे गावठी कट्टे दिसत असल्याचे अनेक घटना तुन दिसून येत आहे. काल जेल रोड येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा नाशिकरोड पथकाने देवळालीगाव स्मशानभूमीजवळ ही कारवाई केली. सूरज प्रमोद भालेराव (रा. जयभवानीरोड) असे या संशयिताचे नाव आहे. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार यांना माहिती मिळाली. एक तरुण गावठी पिस्तूल बाळगून वावरत आहे. पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली तो स्मशानभूमीजवळ वेताळ बाबा मंदिराजवळ उभा असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.