ब्रेकिंग

प्रभाग एकमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहणार. प्रभाग एकमधील मतदारांकडून पुन्हा भाजपा उमेदवारांना निवडून देणार असल्याची भावना व्यक्त

नाशिक जनमत  प्रतिनिधी:- प्रभाग एकमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहणार असल्याचे भावना मतदारांकडून प्रचार दौऱ्या दरम्यान ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रभाग एक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या उमेदवारांनी या भागात अनेक मोठी विकास कामे केली असून त्या माध्यमातून परिसराचा कायापालट होताना दिसून येत आहे. त्यामुळे हा विकास अविरतपणे सुरू राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग १ मधील माजी नगरसेवक अरुण पवार, माजी महापौर रंजना मानसी व माझी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या माध्यमातून प्रभागात पेठ रोड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, सातशेहून अधिक आसन व्यवस्था असणारी भव्य तीन मजली ई लर्निंग अभ्यासिका, क्रिकेट टर्फ, नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, उद्यानांची निर्मिती, कॉलनी रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरण, समाज मंदिरांची व सभा मंडपाची उभारणी प्रकारचे विविध विकास कामे प्रभागात करण्यात आली असून यामुळे प्रभागातील नागरिक समाधानी असल्याची भावना व्यक्त करत आहे. तसेच यंदाही पुन्हा भाजपाच्या रूपाली स्वप्निल ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दिपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देणार असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली आहे.

दिंडोरी रोडवरील प्रभातनगर प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. पुढे वाढणे कॉलनी, केतकी नगर, श्रीराम नगर, वरद नगर, कणसरा माता मंदिर परिसर, आश्रम शाळा परिसर, अवतार पॉईंट या मार्गावर प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत केले. तर महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत मग एक मध्ये रॅलीचे आयोजन शुक्रवार, (दि ०९) रोजी करण्यात आले असून रॅलीची सुरवात आरटीओ कॉर्नर येथून होणार असून पुढे ओंकार बंगला, मा. ए टी पवार आश्रमशाळा, केतकी सोसायटी, वडाचे झाड, म्हसरूळ गाव, भाजी मंडई, जिजामाता चौक, बालाजी चौक, ममता स्वीट्स, राजमाता मंगल कार्यालय, आरटीओ कॉर्नर येथून मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे रॅलीची सांगता होणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे