ब्रेकिंग

त्रंबक रोडवरतीन वाहणाचा अपघात. एक जण गंभीर जखमी.

 

नाशिक जनमत  नासिक मध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत ट्राफिक मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात जाम होत आहे. तर संध्याकाळी पाच ते रात्री आठच्या दरम्यान नाशिक शहरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून जात आहे. यावेळेस ट्राफिक हवालदार काही ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने वाहतूक विस्कळीत होते. दरम्यान रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे अपघाताच्या संख्या वाढलेल्या आहे. काल त्रंबक रोड येथे रोडवरील येथे

वेगात जाणाऱ्या कारने (एमएच १५ एफटी ५७७४) पुढे जाणाऱ्या दुचाकी व रिक्षाला पाठीमागून धडक दिली. यात माळोदे नामक दुचाकीचालक जखमी झाला. सोमवारी त्र्यंबक रोडवर शरणपूर पोलिस चौकीसमोर हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जलतरण तलावकडून त्र्यंबकरोडकडे ही कार जात होती. जखमी चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे