मोबाईल चोरीचे प्रकार वाढले. पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल खेचून पलायन.
पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल खेचला
नाशिक । नाशिक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून घरफोडी चेन स्कॅनिंग दुचाकी वाहन चोरी यांचे प्रमाण वाढले आहे. आता तर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल पायी बोलत जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल खेचण्यात आला. सहवासनगरकडे जातांना हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री १०.२० वाजता जेवण झाल्यानंतर जनलक्ष्मी बँके ते सहवासनगर शतपावली करत फोनवर बोलत असतांना बँकेडून सहवासनगरकडे जाताना समोरुन दुचाकीने आलेल्या व्यक्तीने अचानक ब्रेक मारत हातातील मोबाइल खेचून नेला व गडकरी सिग्नलमार्गे सरडा सर्कलकडे तो पळून गेला. या घटनेचा तपास पोलीस करत आहे. रात्रीची वेळ साधून चोराने हातातील मोबाईल चोरून पलायन केले. यामुळे रात्री शतपावली करणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.