लासलगाव रेल्वे स्टेशन जवळ मेंटेनेस करणाऱ्या रेल्वे इंजिनची चार रेल्वे कर्मचाऱ्यांना धडक. चार जणांचा मृत्यू.
नाशिक जनमत लासलगाव रेल्वे स्टेशन नजीक रेल्वे ट्रॅक चे ब्लॉक तयारी करण्याचे काम चालू असताना आज सकाळी पावणेसहा वाजता रेल्वे लाईनचे मेंटेनन्स करणाऱ्या रेल्वे इंजिनने चार रेल्वे कर्मचाऱ्यांना धडक दिल्याने चारही जन ठार झाले आहेत. सकाळी सकाळी अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतामध्ये संतोष भाऊराव केदारे वय 38 दिनेश साधू दराडे 35 कृष्णा आत्माराम अहिरे वय चाळीस.स्तोष सुखदेव शिरसाट.वय 38 यांचा समावेश आहे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती लासलगाव पोलीस घटनास्थळी हजर झाले रेल्वे इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांतर्फे संताप अनावर झाल्याने रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी समज देऊन रेल्वे थांबण्यात आला. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य मंत्री भारती पवार यांनी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी रेल्वे इंजिन चालकाला ताब्यात
घेतले आहे. संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे चालकाला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी प्रसंग वादन राखत रेल्वे ड्रायव्हरला सुरक्षित स्थळे हलवले. अधिक तपास पोलीस करत आहे.