बांधकाम विभागा कडून बरेचसे कामे पूर्ण.
जनसंपर्क विभाग
नाशिक महानगरपालिका
विषय – बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची बहुतांशी कामे पूर्ण,
पाऊस नसल्याने डांबरीकरणाला सुरुवात, ऑनलाईन तक्रारीचीही दखल
नाशिक महागनरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे शहरातील सहाही विभागात रस्ते दुरुस्तीबाबत जागृत राहुन तत्परतेने कामे केली जात आहेत. पाऊस नसल्याने आता खड्ड्यांची दुरुस्ती डांबरीकरण करुनही केली जात आहे. नाशिक रोड विभागात आर्टलरी सेंटर रोड इथं एमएनजीएलने गॅस पाईपलाईनसाठी केलेली खोदाई डांबर, खडीचा वापर करुन बुजवण्यात आली. पूर्व विभागातही प्रभाग क्रमांक 23 मधील कॅनल रोड इथं खड्डे बुजवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 30 मधील पांडव नगरी परिसरातील रस्त्यावरील खड्डे पेव्हर ब्लॉकने दुरुस्त करण्यात आले. महाजन नगर तसेच त्रिमूर्ती चौक येथील अमोल ओढेकर यांनी रस्त्याबाबत ऑनलाईन तक्रार केली होती. त्याबाबतही दखल घेत कार्यवाही करण्यात आली. पेठ रोड, अडगोने कॅनल रोडवर भराव टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. पेठ रोड तावली फाटा येथील खड्डेही बुजवण्यात आले. नविन नाशिक (सिडको) विभागात अंबड एमआयडीसीतील ई आणि एफ सेक्टर भागातील खड्डे बुजवण्यात आले. नाशिक पश्चिम विभागातील कॉलेज रोड ते गंगापूर रोड या मार्गावर क्रोमा शोरुमजवळ पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवले जात आहेत.
कामाच्या दर्जाबाबत सक्त निर्देश
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने कार्यवाही केली जात आहे. रस्त्या संदर्भात कोणतीही कामे करताना योग्य पद्धतीने आणि उत्कृष्ट दर्जाची करावीत अशी सक्त निर्देश कंत्राटदारांना बांधकाम विभागाने दिली आहे.
…………………………………………………………………………………………..