गुजरात मध्ये पूल कोसळून 13 जण ठार पाच जण बचावले.
गुजरात : 3 वर्षांपासून जीर्ण पूल खचला, ९ वाहने नदीत पडली, १३ ठार, ५ बचावल
नासिक जनमत गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील पादरा तालुक्यात ४० वर्षे जुना गंभीरा पुलाचा १२ मीटर लांबीचा प्री-स्केप स्लॅब बुधवारी सकाळी ७:५५ वाजता हादऱ्यांमुळे कोसळला. यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूंनी येणारे दोन ट्रक, दोन पिकअप व्हॅनसह ९ वाहने ११० फूट खोल महिसागर नदीत कोसळली. एक टँकर पुलाच्या
( अतिशय दुखद घटना आई व मुलगा एकाच गाडीत प्रवास करत होते फुल तुटला आणि आई व मुलगा बाहेर फेकले गेले यावेळी आई सुखरूप पाण्यात पडली पण मुलगा पाण्याच्या खाली अडकला त्यात तो मृत्युमुखी पडला. आईने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला मुलाला वाचवावो पण कुणी मदतीला आले नाही.)
काठावर अडकला. या अपघातात २ मुलांसह १३ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले. ५ जण बेपत्ता आहेत. गेल्या ४ वर्षांत गुजरातमधील ही पूल कोसळण्याची १६ वी घटना आहे. गंभीरा पूल मध्य व दक्षिण गुजरातला जोडतो. पादरातील २५ कंपन्यांचे २० हजार कर्मचारी दररोज पूल ओलांडतात. पूल जीर्ण झाल्यामुळे नवीन पुलासाठी ३ महिन्यांपूर्वी २१२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
बांधकाम विभागाने रिपोर्ट लपून ठेवला.
पिलर आणि प्री-स्केप स्लॅब यात होते अंतर, रिपोर्ट दडवला
हा पूल १९८५ मध्ये सुरू झाला. चार वर्षांपासून त्याच्या खांब आणि स्लॅबमध्ये अंतर होते. त्यामुळे कंपन वाढत होते. मुजपुरा जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंग परमार यांनी ४ ऑगस्ट २०२२ रोजी वडोदरा जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. पथकाने पुलाचे खड्डे भरले, परंतु पुलाचा तपास अहवाल नकारात्मक असूनही तो सुरू ठेवला. हर्षदच्या मते, प्रशासनाने अहवाल दडवून ठेवला आहे. अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येक राज्यांमध्ये पावसाळा चालू होण्याच्या अगोदर प्रत्येक पुलाचे ऑडिट करणे महत्त्वाचे आहे.