कृषी तंत्र विद्यालय चिंचवड येथे कृषी दिन उत्साहात साजरा.
*कृषी तंत्र विद्यालय चिंचवड येथे कृषी दिन उत्साहात साजरा.*
दि.1जुलै.शुक्रवार.
त्र्यंबकेश्वर. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कृषी दिन साजरा करण्यात येतो, या कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी तंत्र विद्यालय, चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय धावपटू (सावरपाडा एक्सप्रेस) *कविता राऊत* यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी इंजी. महेश तुंगारे, माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री.चौधरी सर, कृषी तंत्र विद्यालय, चिंचवडचे
प्राचार्य प्रा.व्ही.व्ही.चव्हाण ,वरिष्ठ पर्यवेक्षक आर. के. देशमुख, पटाईत सर, पि.के. बिरारी, एच.ऐ.पवार, जे.व्ही.पवार, भोये मॅडम, बाळू पाटील, चौधरी मामा आदींची उपस्थिती होती.
यावेळी सदाहरित,काटेरी तसेच वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये कडुलिंब, जांभूळ, टॅटू, सुबाभूळ, सिताफळ,करंज, वड इत्यादी वृक्ष असून,उर्वरित काही वृक्षांची लागवड येत्या 15 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.
विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत व इंजि. महेश तुंगार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील हरित कॅम्पस बघून त्यांनी आनंद व्यक्त केला.