नाशिक मधील इंदिरानगर भागातील पाथर्डी परिसरामध्ये मुलाने व आईने वडिलांचा केला खून

नाशिक जनमत प्रतिनिधी नासिक मध्ये पुन्हा एकदा खुनाची घटना घडली असून मुलाने व आईने पतीचा नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रात्री झोपेत असलेल्या पतीचे मुलाने वडिलांचे पाय धरत व पत्नीने डोक्यात मुसळ मारून पतीचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले असून. पाथर्डी फाटा परिसरामध्ये खुणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
पती दादाजी पोपट गवळी.वय 41 त्याचे नात्यातील एका महिले बरोबर अनैतिक संबंध होते. यावरून अनेक दिवसापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. नातेवाईकांनी एकत्र बसत व आत मिटवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आज पहाटे पाच वाजता पत्नी सुनीता व मुलगा यांनी दोघांनी मिळून डोक्यात मुसळ मारल्याने दादाजी प*** गवळी यांचा मृत्यू झाला. दरम्यान ही घटना सकाळी वाऱ्यासारखी पाथर्डी फाटा परिसरात पसरली यानंतर दादाजी प*** गवळी रहात असलेल्या समृद्धी प्लाझा या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनास्थळावर इंदिरानगर पोलीस यांनी पंचनामा करून मुलगा व मयताची पत्नी सुनीता त्यांना ताब्यात घेतले. पोस्टमार्टम साठी प्रेत सिविल हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले . दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारी घरपोडी खून अशा घटना वाढत असल्याचे चित्र आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढावी. असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.