महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खड्डे भरो आंदोलनाला यश*.
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खड्डे भरो आंदोलनाला यश*.
*नाशिक मनपा प्रशासनाला अखेर डांबर मिळाला*.
खड्डेयुक्त रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार व जनतेला चांगले रस्ते कधी मिळणार?
*मनपाला कोणी डांबर देतं का डांबर*. असा प्रश्न उपस्थित करीत मनसेच्या वतीने पंधरा दिवसांपुर्वी स्वखर्चाने माती आणुन प्र. क्रं. 29 मधील विजयनगर ते दत्तचौक परिसरातील खड्डे बुजवले होते. व अखेर पंधरा दिवसांनी मनपा प्रशासनाला जाग आली व आज माती टाकुन बुजवलेले खड्डे व्यवस्थित रित्या माती काढुन त्यावर डांबर टाकुन पैच करुन डागडुजी करण्यात आले. त्याबद्दल मनसेने केलेल्या रस्त्यातील खड्डे भरो आंदोलनाची दखल घेत मनपाने डांबर टाकुन डागडुजी केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व मनसे पदाधिकारींनी देखील मनपा प्रशासनाचे आभार मानले.
त्याप्रसंगी *मनसे नाशिक शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदिप दोंदे, मनसुरसे चिटणीस कैलास मोरे, देवचंद केदारे ,वहातुक सेना उपशहराध्यक्ष प्रविण महाले, मनविसे शहर सचिव शंकर कनकुसे, संदिप मालोकर, अनिकेत निकम, ईश्वर कदम* हे उपस्थित होते.