ब्रेकिंग

गाडी लावण्याचा वाद.सोसायटीत. चेअरमनसह सदस्यांच्या मारहाणीत रहिवाशाचा मृत्यू.

 

प्रतिनिधी नाशिक जन्मत नासिक मध्ये हाणामाऱ्या. खून अशा घटना चालूच आहे. पोलिसांचा धाक पाळत नसल्याचे दिसत आहे. किरकोळ कारणावरून काल पंचवटीतील हिरावाडी परिसरात

इमारतीच्या पार्किंगमध्ये कार लावण्याच्या वादातून सोसायटीतीलच इतर रहिवाशांमध्ये झालेल्या वादात सोसायटीच्या चेअरमनसह इतर सदस्यांनी केलेल्या मारहाणीत एका रहिवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील हिरावाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि. २१) सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून पंचवटी पोलिस ठाण्यात सोसायटीच्या चेअरमनसह इतर सदस्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दामोदरनगर भागात श्री केशवहरी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ८ मध्ये राहणारे व्यावसायिक बुधल लक्ष्मण विश्वकर्मा (४६) यांचा या मारहाणीत मृत्यू झाला.

 

पंचवटीच्या दामोदरनगरातील घटना, पीव्हीसी पाइप डोक्यात घातला

 

चेअरमनसह ६ सदस्यांविरोधात गुन्हा दाखल

 

पंचवटी पोलिसांना घटना समजताच त्यांनी केशवहरी अपार्टमेंटमधील रहिवाशांचे जबाब घेतले. विश्वकर्मा यांच्या पत्नी व सुलाच्या तक्रारीनुसार चेअरमनसह सहा सदस्यांविरोधात

 

खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात पोलिसांनी संशयित वसंत घोडे, विशाल घोडे, गणेश घोडे यांच्यासह ह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

विश्वकर्मा कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश

 

बुधल विश्वकर्मा यांना त्यांच्या पत्नी व मुलासमोर मारहाण झाल्याने त्यांनी एकच आरडाओरड केली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे निधन झाल्याचे समजताच पत्नीने हंबरडा फोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मोठा मुलगा त्यांच्या फर्निचरच्या व्यवसायात त्यांना हातभार लावत असून काही दिवसांपूर्वीच त्यांची आर्थिक घडी बसली होती.

 

विश्वकर्मा यांच्या फ्लॅटसमोरील ९ नंबरच्या फ्लॅटमध्ये जाधव नामक रहिवासी राहतात. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास इमारतीच्या वाहनतळावर कार लावण्यावरून जाधव व विश्वकर्मा कुटुंबियांत वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार बघून सोसायटीचे चेअरमन वसंत घोडे व इतर

 

सदस्यांनी विश्वकर्मा यांना ‘तुमचा नेहमीचा त्रास आहे’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर विश्वकर्मा यांनीही शिवीगाळ केल्याने चेअरमनसह इतर सदस्यांनी त्यांना मारहाण केली. यात संशयितातील एका सदस्याने पीव्हीसी पाइप डोक्यात मारल्याने विश्वकर्मा गंभीर जखमी झाले. कुटुंबियांनी विश्वकर्मा यांना

 

शहरात 3 दिवसांत खुनाच्या ४ घटना

 

(१८ जानेवारी) : आडगावच्या हिंदुस्थान नगरात पत्नीकडून पतीचा खून.

 

(१९ जानेवारी): पंचवटीतील हिरावाडी येथील शिक्षिकेचा गळा आवळून खून झाला..

 

3 (१९ जानेवारी): उपनगर येथे मूकबधिर मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत त्यास सहाव्या मजल्यावरून ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

 

४ (20 जानेवारी) : पंचवटीतीलच हिरावाडी भागात पार्किंगच्या किरकोळ वादातून अशाप्रकारे मारहाण करत खुनाची घटना घडली. या चारही घटनांमधील दोन गुन्हे उघडकीस आले असले तरी उर्वरित दोन गुन्ह्यांत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

 

जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रवेशद्वारावरच विश्वकर्मा यांना चक्कर आल्याने त्यांना अपघात विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासत मृत घोषित केले. याप्रकरणी विश्वकर्मा यांच्या मुलाने मंगळवारी पहाटे जिल्हा रुग्णालयातील पोलिसांना याबाबत माहिती दिली.

धार्मिक शहर असलेले नाशिक भूमी मध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर खून हाणामाऱ्या घरफोड्या सोनसाखळी चोरी क्राईमच्या घटना वाढलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी रात्रीची दिवसाची ग्रस्त वाढवण्याची गरज झालेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे