एक हजार रुपये लाच घेताना नगरसुलच्या तलाठ्यास अटक.

एक हजार रुपये लाच घेताना नगरसुलच्या तलाठ्यास अटक
८० हजार मासिक पगार तरी पैशांची मागणी
येवला । नासिक जनमत प्रतिनिधी नगरसूल येथे तलाठी म्हणून सेवेत असलेला व कुसमाडी येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळणारा तलाठी बापू वामनराव पवार (वय ५४) यास एक हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पवार यांना ८० हजार रुपये मासिक पगार आहे.
वडिलोपार्जित शेतजमीन मुलाच्या नावे करण्यात आल्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याची मुलाच्या नावे नोंद होण्यासाठी एक हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठ्यास पकडण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेत पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणी केली होती. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी पवार यांच्याकडे दिली होती. परंतु, सदरची नोंद मुलाचे नाव चुकल्याने रद्द झाली होती. ती दुरुस्त करून सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी पवार यांनी त्याच्यासाठी एक हजार रुपये व मंडळ अधिकारी यांच्यासाठी ५०० रुपये लाचेची मागणी करून नोंद करण्यासाठी प्रथमतः एक हजार रुपये लाच स्वतःसाठी स्वीकारली असता, रंगेहाथ पकडण्यात आले असून येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर’ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात
आली. पथकात पोलीस हवालदार शरद हेबाडे ,. पोलिस नाईक युवराज खांडवी, विनोद पवार यांनी कारवाई क