ब्रेकिंग

बँक ऑफ महाराष्ट्र. व आर सिटी तर्फे ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांना व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीचे प्रशिक्षचां निरोप समारंभ.

बँक ऑफ महाराष्ट्र, व महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतफॅ मोफत 30 दिवसाचे फोटोग्राफ्रि व व्हिडिओ शूटिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 30 युुवक व 2 युवतीने सहभाग घेतला होता दि- 30 तारखेला सदर प्रशिक्षणचा निरोप समारंभ कायॅक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आर-सेटी चे माजी प्रशिक्षणाथीॅ व यशस्वी फोटोग्राफर अमोल देशमाने, नाशिक जनमत चे संपादक चंद्रकात धात्रक हेमंत साळवे, कायॅक्रम चे अध्यक्ष महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेचे संचालक गणेश सरोदें सर, होते, सूत्रसंचालन गायत्री चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक भाषण आर-सेटी चे

 

 

 

संचालक गणेश सरोदें ह्यानी केले,पाहुण्याचा परिचय व स्वागत आर-सेटी चे प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी केले,गणेश देशमुख,चेतन पारधी,निलेश तिदमे यानी मनोगत व्यक्त केले,तर प्रशिक्षक समीर कुलकणीॅ यांनी आभार मानले, पाहुणे चे हस्ते प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले. यावेळेस चंद्रकांत धात्रक यांनी

 

 

 

विद्यार्थ्यांना फोटोग्राफी व व्यवसायाविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले. व्यवसाय करताना व्यसनापासून दूर राहावे असे त्यावेळेस त्यांनी

 

सांगितले. युद्ध चिकाटी ध्येय व तोंडात गोडवा नम्रता संयम शांतता ठेवावी राग क्रोध यास आपल्यापासून लांब ठेवावे यामुळे जीवनामध्ये नक्कीच यश मिळते विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे