ब्रेकिंग

मखमलाबाद शेत परिसरात बिबट्या. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना कैद.

नाशिक जनमत.  नाशिक शहर व परिसरामध्ये नेहमीच बिबट्यांचे आगमन होत असते. महिना दोन महिन्यात पांडवलेणी परिसर तसेच गंगापूर रोड इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन होत असते. शहरी भागाकडे बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मखमलाबाद मधील मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. मखमलाबाद येथील कैलास पिंगळे यांच्या वस्तीवर अंदाजे चार वर्षाच्या बिबट्याने श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला .मात्र श्वान जोर जोरात ओरडू लागल्याने बिबट्या तेथून पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. यानंतर श्री कैलास पिंगळे यांनी वन विभागाला कळवले असता वन विभागाने घटनास्थळावर देऊन वस्तीवरील शेतातील ठिकाणी बिबट्याचे लहान मोठे ठसे आढळून आले. दरम्यान बिबट्या बरोबर लहान

 

 

 

 

 

 

 

त्याचे पिल्ले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील मॉर्निंग वाक् व शेतातील कामे करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर वन विभागाने य ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे