शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष किसान मजदूर फोरम कमिटी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्यपालांन कडे मागणी ..*
*. राष्ट्रीय अध्यक्ष किसान मजदूर फोरम कमिटी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्यपालांन कडे मागणी केली आहे.*
दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा, बी-बियाणे व खते मोफत पुरवा. मा. राजेंद्र वाघ राष्ट्रीय अध्यक्ष किसान मजदूर फोरम कमिटी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात मा. राज्यपालांन कडे मागणी केली आ
राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमीझालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत.टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली,याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थीती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्याचे देशाचे किसान मजदूर फोरम कमिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र वाघ यांनी सांगितले. तसेच मा. राज्यपाल रमेश बैस यांना दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर निवेदन दिले जाईल असे सांगितले आहे.
पुढे म्हणाले की,राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते तर काही मंत्री परदेशात गेले होते.मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते.या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती,ह्याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्याला आधाराची गरज आहे.राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.राज्यात खतांचा )काळाबाजार सुरु आहे.खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी करण्यात येणार आहे.
साक्री तालुक्यातील दिघावे येथील तुर गवार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला अनधिकृत वालपापडी बियाणे विकणे भोवले… कृषी अधिकाऱ्यांकडून गुना दाखल.