बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स कॅम्प साठी नाशिकच्या साहिल पारखची निवड.
बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स कॅम्प साठी
नाशिकच्या साहिल पारखची निवड
नाशिक जिल्हा क्रिकेट साठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १९ वर्षांखालील युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या हाय परफॉरमन्स कॅम्प – उच्च कामगिरी साठीचे शिबिर – साठी निवड झाली आहे.साहिलसह महाराष्ट्राच्या किरण चोरमाळेची देखील निवड आली आहे.
यंदा २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबीरात साहिलची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली व ४ डावात १६८ च्या सर्वाधिक स्ट्राइक रेट नी ९१.६७ च्या सरासरीने एकूण २७५ धावा कुटल्या. या कामगिरीच्या जोरावर या कॅम्पसाठीचे पहिल्या २५ खेळाडूंच्या चमूत निवड झालेल्या साहिलने १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या निवडीच्या दृष्टीने आपले पाऊल पुढे टाकले आहे.
वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता साहिलची एन सी ए च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या ( सिनियर इन्व्हिटेशन लीग ) टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतहि वरिष्ठ खुल्या गटात खेळताना साहिलने ३ सामन्यात १८४ च्या स्ट्राइक रेट नी एकूण १६४ धावा फटकावल्या.
या हंगामात इंदोर येथे झालेल्या बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. बी सी सी आय च्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती . बी सी सी आय ची सदर १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा ३ ते ९ नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी येथे खेळवण्यात आली . त्याआधी १६ वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी ( इन्व्हिटेशन लीग ), स्पर्धेतील जोरदार कामगिरी मुळे १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळताना बी सी सी आय विजय मर्चंट ट्रॉफीतहि साहिलने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.
साहिलच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आह