दिव्यांग व्यक्ती करिता साधन सहाय निदान शिबीराचे आयोजन* *: योगेश पाटील*
*दिव्यांग व्यक्ती करिता साधन सहाय निदान शिबीराचे आयोजन*
*: योगेश पाटील*
*नाशिक, दिनांक: 24 मे, 2023
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय नाशिक, जिल्हा पुनर्वसन केंद्र नाशिक व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तीसाठी 19 जून ते 21 जून 2023 दरम्यान साधन सहाय निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी दिव्यांग व्यक्तींनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींकरिता साधन सहाय निदान शिबीराचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक येथे 19 जून 2023 रोजी, सामान्य रूग्णालय, कळवण येथे 20 जून 2023 रोजी तर सामान्य रूग्णालय, मालेगाव येथे 21 जून 2023 रोजी करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अशी आहे. शिबीरात पायांनी दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी जयपूर फूट (कृत्रिम अवयव), पोलिओ ग्रस्तांसाठी कॅलीपर्स किंवा क्रचेस (कुबडी) व कोपऱ्याच्या खाली हात नसलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम हात वाटप करण्यात येणार आहे.
शिबीरात नाव नोंदणीसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नाशिक येथे सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत कविता जुनेजा यांच्या 8767047438 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असेही योगेश पाटील यांनी कळविले आहे.