1993 सालच्या विद्यार्थ्यांचे तीस वर्षानंतर गुरु शिष्यपुन्हा भेट..
मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- जगात गुरुपेक्षा कोणीही मोठा नाही. गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे.कदाचित त्यामुळेच आपल्याला गुरुंची पूजा करण्याची समृद्ध परंपरा आहे. अशाच एका गुरुवर्य सोबत १९९३ च्या विद्याथ्यांचे ३० वर्षानंतर गुरू शिष्य स्नेहामृत स्नेहसंमेलन नुकतेच तळेगाव (ता.चाळीसगाव) येथील
माध्यमिक विद्यालयात गुरुजन विद्यार्थी व गुरुशिष्य भेटीगाठीचा स्नेह सोहळा अत्यंत मोठ्या आनंदात पार पडला.
तळेगाव (ता.चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालय गुरू व शिष्य यांनी एकत्रित येऊन विद्यालयात प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. यानंतर आपल्या दहावीच्या वर्गात गुरू सोबत जावून बेंचवर बसून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला . यानंतर येथील शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाच्या करण्यात आले.
चाळीसगाव येथील आर. के. लॉन्स येथे सरस्वती पूजनानंतर गुरुजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेल्या जिव्हाळ्यासंबंधीच्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक मु. ए. निकुंभ हे होते. दिवंगत स्नेही व गुरूजन यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास गुरुवर्य वाय एम सूर्यवंशी,श्री खोडगे, व्ही. टि.पाटे, एस. एस. कोतकर, एन.डी.बागुल, एन. के. सांगळे,वाय.एम.सूर्यवंशी, एच.डी, माळी, श्री बोरसे, श्री तायडे, एन. डी. पाटील, ए.डी. सुर्यवंशी,पी. बी. गायकवाड,देविदास बाविस्कर श्री बोरसे,श्रीमती बैसाने, कुमुदिनी पाटील, श्रीमती देवरे, एस.जी.अहिरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ संतोष सांगळे व कैलास गायकवाड यांनी केले.
आभार दिनेश मोरे यांनी मानले.
सैन्य दलातील सेवानिवृत्त वर्गमित्र जवानांचा सत्कार
देशासाठी २० वर्ष सैन्यदलात सेवा निवृत्त झालेले सुभाष काकडे,शिवाजी राठोड मच्छिंद्र तारडे या दोन्ही जवानांचा कारगिल युध्दात सहभाग होता. त्यांचा देखील सत्कार यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक मु. ए. निकुंभ यांच्या हास्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ संतोष सांगळे, दीपक मोरे, कैलास गायकवाड, दिनेश मोरे, मनोज सानप,राजेश चव्हाण, रामराव शेलार,विलास सुळ लिलाधर पवार, डॉ गणेश देवरे, सुनील सूर्यवंशी, सुनील सांगळे, मंगल मोरे,रेखा शेलार यांच्यासह सर्व विद्यार्थी मित्रांनी परिश्रम घेतले.