*राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार* *आदिवासी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन* .
: 14 नोव्हेंबर, 2022
*राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार*
*आदिवासी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन*
*नाशिक, दिनांक 14 नोव्हेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
आदिवासी विभागाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 3 वाजता आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे तसेच स्वातंत्र्यलढा व राष्ट्र निर्मितीमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण व त्यांचा गौरव करण्यासाठी आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि.15 ते 18 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पारंपरिक नृत्य स्पर्धा सायंकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत, 17 व 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजता लघुपट महोत्सव होणार आहे. तसेच या महोत्सवात आदिवासी बांधवांच्या हस्तकलांचे साधारण 210 स्टॉल लावण्यात येणार असून अंदाजे 42 नृत्यपथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
या महोत्सवास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, छगन भुजबळ, किशोर दराडे, दिलीप बोरसे, ॲड माणिकराव कोकाटे, मोहम्मद खालिक, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम व तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.