अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना महा डिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचेआव्हान.
नाशिक जनमत
- *अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना*
*महा डिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन*
*नाशिक दिनांक: 14 नोव्हेंबर, 2022
कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन महा डिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.
शेती उपयुक्त औजारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कृषी योजनांमध्ये प्रामुख्याने या योजनेतंर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित औजारे, रोटावेटर, नांगर, सीड ड्रिल, रिपर काढणी पश्चात अवजारे, थ्रेशर, हार्वेस्टर, मनुष्यचलित औजारे, पीक संरक्षण औजारे, डाळ मिल, ड्रोन इत्यादी औजारे व कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, शेततळे, अस्तरीकरण, सामुहिक शेततळे, पॅकहाऊस, क्षेत्र विस्तार, पु.अहिल्याबाई होळकर रोपवाटीका, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनांचा समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डिबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करवायाचा आहे.