पिंपळकोठेमध्ये शेतीच्या वादातून काकाचा खून.खून
नाशिक जनमत बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे यांचा अपघाती मृत्यू नसून जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे जायखेडा पोलिसांनी आरोपी सुजित भामरे यास अटक केली असून खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे सुरुवातीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक रमेश भामरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनाही संशय आला होता चौकशीत पुतण्या सुधीर भामरे यांनी भामरे यांच्या दुचाकी धडक दिली भांबरे जखमी झाल्यानंतर डोक्यावर हत्याराणी वार करत खून केल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे चेतन भामरे यांनी पोलिसात लेखी तक्रार दिल्यानंतर काका आणि पुतण्याचे वाद असल्याची माहिती मिळाली होती दरम्यान या परिसरामध्ये या घटने मुळे खळबळ उडाली आहे . अधिक तपास पोलीस करत आहेत