महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील ) सांगलीचा नाशिकवर विजय
महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील )
सांगलीचा नाशिकवर विजय
शाल्मली क्षत्रिय ७८
नाशिक जनमत. धुळे येथे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत ,एक दिवसीय सामन्यात सांगलीने नाशिकवर ६ गडी राखून विजय मिळवला.
धुळे येथील सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाशिकने ४० षटकांत सर्व बाद १५२ धावा केल्या. कर्णधार शाल्मली क्षत्रियने ७८ व कार्तिकी गायकवाडने २२ धावा केल्या. विजयासाठीचे १५३ धावांचे लक्ष्य सांगलीने ४७.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सांगलीच्या कर्णधार सह्याद्रि कदमने ६२ व रितु जामदारने ३० धावा केल्या. नाशिकतर्फे अस्मिता खैरनारने २ तर शाल्मली क्षत्रिय, श्रुती गीते व प्रचिती भवरने प्रत्येकी १ बळी घेतला.
शाल्मली क्षत्रिय