ब्रेकिंग
नाशिक मध्ये पत्नीने केली पतीची हत्या.? .दोन दिवसानंतर गुन्हा उघडीस.
नासिक जनमत नासिक मधील वडाळा परिसरामध्ये पत्नीने पतीचा धारदार शास्त्राने खून केल्याचा प्रकार घडला आहे. दोन दिवसापूर्वी हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे .घराच्या आजूबाजूला उग्र वास येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले असता दरवाजा उघडतात समोर धारदार शस्त्राने पोटात घाव घातल्याने खून झाल्याचे समोर येत आहे. घटना घडल्यानंतर पत्नी फरार झालेली आहे. सदर इसमाची ही दुसरी पत्नी होती. ज्याचा खून झाला हा विषय गॅरेज वर मेकॅनिकचे काम करत होता दरम्यान या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेबरोबर खुणाच्या घटनांमध्ये अजूनही काही इसम सहभागी आहेत का याचा तपास इंदिरानगर पोलीस करत आहे.