पत्नीने केला भूलीचे इंजेक्शन देत पती ला जीवे मारण्याचा प्रयत्न .म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
भुलीचे इंजेक्शन देत पतीला ठार मारण्याचा महिलेचा प्रयत्न
प्रतिनिधी । नाशिक
पत्नी जिवंत असताना दुसऱ्या
महिलेसोबत अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने पत्नीने तीच्या वडिलांशी संगनमत करत पतीलाच हॉस्पिटलमध्ये भुलीचे इंजेक्शन देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. १० स्प्टेंबर रोजी म्हसरुळ परिसरात हा प्रकार घडला होता. १४ दिवसानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संशयित महिलेसह तीच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित इसमाच्या मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित महिला आणि तीच्या वडिलांनी संगनमत करून वडिलांना म्हसरूळ परिसरातील एका रुग्णालयात ‘दाखल केले होते. परस्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून संशयित महिलेले पतीचा काटा काढण्यासाठी रुग्णालयात अॅडमिट असताना भुलीचे इंजेक्शन देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न के. वरीष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.