बिबट्याची कारला धडक. बिबट्या अडकला बोनेट मध्ये.
नाशिक जनमत प्रतिनिधी. दिवसेंदिवस जंगल कमी होत असल्याने वन्यजीव नागरी वस्तीकडे वळत आहे त्यांची संख्याही वाढत असल्याने मोठ्या शहरांमध्ये व अनेक गावांमध्ये बिबट्या सारख्या प्राण्यांची दर्शन होऊ लागले आहे काल मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड जवळील राहुड बारी घाटात बिबट्याच्या आणि चार चाकी चा अपघात झाला. बीबट्या चे नशीब चांगले असल्याने जीवघेणे अपघात त्यामधून बिबट्या वाचला आणि त्याने जंगलामध्ये धूम ठोकली ा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेला उधाण आले आहे काल दुपारी दोन ते अडीच या दरम्यान राहुट घाटात बिबट्या रस्ता ओलांडत होता त्याच वेळेस एक चार चाकी समोर आल्याने अपघात झाला कार चालकाने गाडी थांबवली परंतु गाडीच्या पुढच्या भागात बिबट्या अडकल्याने तो जखमी झाला वाचविण्यासाठी धडपड करत होता याचवेळी चालकाने गाडी मागे घेतली व बिबट्या बोनेट अडकला होता. यातून तो सुटला व थेट जंगलात पळून गेला हा थरारक प्रसंग गाडी चालकाने बघितला दरम्यान काही नागरिकांनी विडियो देखील बनवला. वनविभागाचे कर्मचारी नंतर शोध घेताना दिसून आले. मानवी वस्ती मध्ये प्राण्यांचा शिरकाव होऊ लागला आहे. वन विभागातर्फे प्राण्यांना पाण्याची व खाण्याची व्यवस्था केली तर जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे येणार नाही असे नागरिक बोलत आहे.